औरंगाबाद: औरंगाबादबरोबरच सध्या राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांची येत्या १ मे दिवशी औरंगाबादेत सभा होणार आहे. मनसेच्या या सभेविषयी आता एक मोठी बातमी समोर आली आहे. २६ एप्रिल ते ९ मे या काळात औरंगाबादमध्ये (Aurangabad) पोलिसांनी जमावबंदीचा आदेश काढला आहे. यामुळे या कालावधीत औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असणार आहे, अशी माहिती मिळत आहे. या आदेशामुळे ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास बंदी राहणार आहे. (Raj Thackeray Latest Marathi News)
शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याकरिता हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलिस (Police) आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये १ मे दिवशी होणार मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या होणारी सभा पोलिसांच्या आदेशामुळे रद्द करावी लागणार आहे. यामुळे आता यावर मनसे नेते याविषयी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. शहरात पोलिस यंत्रणाने घेतलेल्या या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सुरुवातीपासून या सभेला परवानगी नाकारली होती. तरी देखील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेने सभेची तयारी सुरु केली होती.
हे देखील पाहा-
रविवारी मनसेकडून सभेच्या ठिकाणी पूजन करून व्यासपीठाच्या उभारणीला सुरुवात झाली होती. मात्र, आता जमावबंदीच्या आदेशामुळे सभेसाठी जोमाने कामाला लागलेल्या मनसैनिकांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे. तर एक बाजूला मनसेने या सेभेचा एक टीझर देखील प्रकाशित केला आहे. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला एक लाखांची गर्दी होणार, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता, असा आदेश लागू झाला असला तरी, मनसेकडून औरंगाबादमध्ये सभा होणारच, असा पवित्रा घेण्यात आला आहे. पोलिसांनी सभेसाठी सुचविलेला पर्यायी जागेचा प्रस्ताव देखील मनसेने नाकारला होता.
मात्र, आता जमावबंदीचा आदेश झुगारून मनसे औरंगाबादमध्ये सभा आयोजित करणार का, हे बघावं लागणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे दिवशी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा होणारच. चिल्लर संघटनांना किती देखील विरोध करू द्या, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, अशा शब्दात मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांच्या सभेला एक लाखापेक्षा जास्त लोक येणार, असा दावा देखील त्यांनी केला आहे. आता पोलिसांच्या या निर्णयावर मनसेची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.