Raj Thackeray's Letter to PM Modi
Raj Thackeray's Letter to PM Modi saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray's Letter to PM Modi: कुस्तीपटूंची तशी फरफट पुन्हा होऊ देऊ नका... राज ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना रोखठोक पत्र

Chandrakant Jagtap

Raj Thackeray's Letter to PM Modi About Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कारवाईसाठी गोल्ड मेडल विजेते कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून कुस्तीपटूंचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. 28 मे रोजी एकीकडे नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडत असताना दुसरीकडे कुस्तीपटूंना बळाचा वापर करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

या घटनेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. 28 मे रोजी झाली तशी कुस्तीपटूंची फरपट पुन्हा होऊ नये यासाठी आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि तोडगा काढावा असं आवाहन राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केलं आहे.

पत्रात काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले की, 'सन्मा. भारताचे पंतप्रधान @narendramodi जी, ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो, ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असताना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये. तसंच आपण स्वतः ह्या विषयांत लक्ष घालून त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावं, ही नम्र विनंती', अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.

येथे वाचा राज ठाकरेंचं पत्र जसंच्या तसं...

"प्रति,

सन्मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी.

सस्नेह जय महाराष्ट्र, आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेंव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर. पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता 'प्रधानसेवक' ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.

ज्यांचा गौरव आपण 'देश की बेटियाँ' असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही 'बाहुबला'चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवीआहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.

ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेंव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत. ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे. तशीच इच्छा/ विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे.

म्हणूनच जर त्यांना योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून देशासाठी पदक मिळवावं असं वाटेल? आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुखाची पर्वा नाही असं चित्र उभं राहिलं तर 'खेलो इंडिया' हे स्वप्नच राहील. जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना आश्वस्त केलं जाईल इतकं तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे. आपण ह्या विषयांत लक्ष घालावं आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती.

आपला,

राज ठाकरे"

काय आहे प्रकरण?

भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक छळा केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात कारवाईसाठी गोल्ड मेडल विजिते नॅशनल हिरो जवळपास महिनाभरापासून दिल्लीत आंदोलन करत आहेत. रविवारी दिल्लीत या कुस्तीपटूंना संसद भवन परिसरात जाण्यापासून पोलिसांनी रोखले होते. (Latest Political News)

त्यानंतर मंगळवारी कुस्तीपटू हरिद्वार येथे गंगेत मेडल विसर्जित करणार होते. परंतु शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली आणि कुस्तीपटूंकडे ५ दिवसांची मुदत मागितली. यानंतर कुस्तीपटूं गंगाकाठाहून माघारी परतले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Wearing Benefits: सोने -चांदीचे दागिने घालताना घ्या ही काळजी, नाहीतर...

Devendra Fadnavis - Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना थेट चॅलेंज, नेमकी कशावरून जुंपली?

Dombivali News: लोकलगर्दीचा बळी! डोंबिवलीजवळ धावत्या ट्रेनमधून पडून २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Narayan Rane Vs Uddhav Thackeray: 'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे, तोंड उघडायला लावू नका! नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, Video

Today's Marathi News Live : मुंबई उत्तरसाठी तेजस्वी घोसाळकर यांचा काँग्रेसकडून लढण्यास नकार?

SCROLL FOR NEXT