Raj Thackeray saam tv
महाराष्ट्र

Raj Thackeray: ईडीचा ससेमिरा अन् कोहिनूर मिल; राज ठाकरेंनी खरं काय ते सगळं सांगितलं, भाजपवर जहरी टीका

Raj Thackeray On Banking ED: राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याबाबतचे कारण स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सूचित केले की, त्यांचा निर्णय केवळ ईडीच्या दबावामुळे घेण्यात आलेला नाही.

Dhanshri Shintre

लोकसभा निवडणुकीच्या (2024) वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला कोणत्याही अटींशिवाय पाठिंबा जाहीर केला आणि निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी मोदी आणि भाजपावर टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटले. त्यांच्या पाठिंब्याबाबत ईडीचा दबाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काहींनी असा आरोप केला की ईडीच्या भीतीमुळेच त्यांनी महायुतीला साथ दिली. मात्र, हे खरे आहे का, यावर स्वतः राज ठाकरेंनीच स्पष्ट भूमिका मांडली.

ईडीची नोटीस का आली ?

ईडी लागली म्हणून मी भूमिका बदलली असं सांगतात. आज खरं काय आहे ते सांगतोय. 2005 मध्ये व्यवसाय सुरू केला. अनेकांना व्यवसाय दाखवता येत नाही पण त्याचं काय सुरू आहे, एनटीएससीच्या मिल काढा अशी बातमी वाचली त्यात कोहिनुर मिल पण होती. आमच्या सहकार्यांना फोन करून सांगितलं. गणित केलं आणि टेंडर भरलं. माझ्या पार्टनरचं फोन आला सकाळी सकाळी घाबरत बोलला टेंडर लागला. 400-500 कोटी लागतील. माझी पण पायाखालची जमीन सरकली.

एका कंपनीला संपर्क केला एक आयएल अँड एफएस नावाची कंपनी होती. ती कंपनी तयार झाली. सगळी किंमत भरतो म्हणाले. आम्ही त्यात पार्टनर होतो. मग मला समजलं हा पांढरा हत्ती आहे. मी पार्टनरला बोललो की आपण यातून बाहेर पडूया. आम्ही बाहेर पडलो. काही दिवसांनी ईडीची नोटीस आली. ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली तेव्हा मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस आणि का आली ? मी गेलो. ते काय बोलत होते मला काहीच कळत नव्हतं. मी सीएला बोलावलं काय आहे ते समजून सांगितलं. आम्ही जो टॅक्स भरला होता तो आमच्यातील एका कंपनीने तो टॅक्स न भरता बाहेर परस्पर पैसे वापरले.

मी विचारला आता काय करायचं? तर ते म्हणाले पुन्ही टॅक्स भरावा लागेल. मग आम्ही पुन्हा आमचा टॅक्स भरला. आता काही नाही ईडीच्या भीतीने मोदींबाबत राज ठाकरेंनी भूमिका बदलली. पण आता एवढ्या गोष्टीसाठी राज ठाकरे मोदींना घाबरला आणि स्तुती करायला लागला? मला काय घेणं देणं त्याच्याशी. मी मानेवर तलवार घेऊन नाही फिरत, पण मोदी जाहीरपणे सांगतात 70 हजार कोटींचा घोटाळा केला आतमध्ये टाकू. काही दिवसांनी अजित पवार सत्तेत गेले. आम्हाला माहीत नव्हतं ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकणार याचा अर्थ असा हे आम्हाला आता समजलं असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना महायुतीत घेण्याच्या मुद्यावरूनही टीकास्त्र सोडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आईला वर्दीत पाहून मिळाली प्रेरणा; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS झालेल्या पूजा गुप्ता आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT