Reasons for Raj Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
महाराष्ट्र

Raj- Uddhav Thackeray: 'ठाकरे बंधू एकत्र येतील, पण मविआला फरक पडणार नाही'; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठं विधान

Maharashtra Politics: राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीबाबत प्रस्ताव पाठवला. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. अशामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली.

Priya More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव पाठवल्यापासून हे दोघे जण पुन्हा एकत्र येणार असल्याबाबत चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपले मत मांडत आहेत. अशामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'ठाकरे बंधूंना पुरोगामी विचारांचा वारसा असून ते लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येतील. ठाकरे बंधू एकत्र आल्याने महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही.', असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संगमनेर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला. मेळाव्याच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. या मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

'जम्मू काश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा मानवतेला काळिमा फासणारा असून हल्लेखोरांना पकडून समुळ नष्ट केलं पाहिजे. अशा प्रसंगी राजकारण नाही केलं पाहिजे मात्र नोटबंदी, 370 कलम हटवल्यानंतर दहशतवाद नष्ट होईल असं सांगितलं गेलं. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असून सरकारने जास्त जागृत राहण्याची आवश्यकता होती आणि आहे.', असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युती बाबतच्या चर्चांवर बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. 'ठाकरे बंधूंना पुरोगामी विचारांचा वारसा असून ते एकत्र आले तर हा वारसा अधिक समर्थपणे पुढे जाईल. लोकशाही वाचवण्यासाठी ते एकत्र येतील आणि महाविकास आघाडीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.', असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

भोरचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसची साथ सोडत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'थोपटे यांच्या संस्थांमध्ये अडचणी निर्माण करून कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला. भाजपच्या रणनीतीचा हा भाग असून त्याचाच परिणाम म्हणून थोपटे भाजपमध्ये गेले.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आधीच इंधन तुटवडा त्यात दरवाढीचा भडका; सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार? VIDEO

आर्थिक समस्या सुटणार, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर महालक्ष्मी प्रसन्न होणार

राज्यातील कारागृह सुरक्षा व्यवस्थेची ऐशीतैशी; अधिकारी-कैद्यांची एकत्र दारू पार्टी

Ambenali Ghat Accident: आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! स्कॉर्पिओ दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

Fact Check: एक्स्प्रेसवेवर नोटांचा पाऊस? ट्रकमधून नोटा पडतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT