Balasaheb Thorat : सरकार म्हणून काम करण्यास अयोग्य; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची महायुतीवर टीका

Ahilyanagar News : आमची परिस्थिती सुधारली की २१०० रुपये देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना स्पष्टीकरण दिले होते. यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSaam tv
Published On

सुशील थोरात 
अहिल्यानगर
: लाडकी बहिणींना २१०० रुपये देणे तर सोडा. पण संजय निराधार योजनेच्या रकमा सुद्धा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. जो निराधार या अनुदानावर अवलंबून असतो, संपूर्ण महिना या रकमेवर काढतो. त्याला सुद्धा अनुदान मिळत नसेल तर ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. निराधाराला तुम्ही काही देऊ शकत नसाल, तर सरकार म्हणून तुम्ही काम करण्यास योग्य नाही, तुम्ही पालनकर्ते नाही; असा टोला महायुती सरकारला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

लाडक्या बहिणीला २१०० रुपये देण्याच आम्ही नाही म्हटलं नाही. आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, सर्व सोंग करता येतात. मात्र पैशांचे सोंग करता येत नाही. ⁠आमची परिस्थिती सुधारली की आम्ही २१०० रुपये देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये बोलताना स्पष्टीकरण दिले होते. यावर माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधला आहे. 

Balasaheb Thorat
Crime News : धक्कादायक! एकटी महिला असल्याची संधी साधत घरात शिरला; दागिने लुटत केला भयानक प्रकार

नागपूर हिंसाचार प्रकरणी सरकारवर निशाणा 
नागपूर येथील हिंसाचार प्रकरणावर देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. छावा चित्रपट इतिहास आहे. म्हणून तो इतिहास आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या पद्धतीने आणायला लागलो. याने देश पुढे जाणार आहे का? असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला. जगामध्ये अनेक देश अनेक पद्धतीने पुढे जाताना पाहत आहेत. अशा वेळेस दंगली सुरू होणे समजा समाजात तणाव होणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. तणाव, दंगली न होणे यासाठी काम करणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं देखील बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

Balasaheb Thorat
Sambhajinagar : वारकरी संप्रदायातील चार मुले गोदावरीत बुडाले; दोघांचा मृत्यू, अंघोळीसाठी गेले असताना घडली घटना

राजकारणाचा स्तर घसरला 
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विषयी झालेल्या आरोपांवर थोरात म्हणाले, कि राजकारणाचा थर किती खाली चालला याचं मूर्तीमंत उदाहरण आहे. राजकारण असते, मतभेद असतात तत्त्वाचं असावा लागतो. चर्चेने प्रश्न सोडवले पाहिजे. कोणाचं व्यक्तिगत जीवन तुम्ही उध्वस्त करण्यापर्यंत जर राजकारण नेत असाल आणि त्यातून राजकारण साध्य करणार असाल; तर राजकारणाचा स्तर लोकशाहीला घातक आहे. अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर घसरत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com