Thackeray Brothers Saam tv news
महाराष्ट्र

Thackeray: काही तासांत ठाकरेंची तोफ धडाडणार; युतीची घोषणा होणार? आधी अन् शेवटी कोण भाषण करणार? A टू Z माहिती..

Thackeray Brothers Reunite After 19 Years: वरळी डोममध्ये आज राज आणि उद्धव ठाकरे तब्बल १९ वर्षांनंतर एकत्र येत आहेत. मराठी विजय मेळाव्यात मराठी अस्मितेच्या लढ्याला नवा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांच्या नजरा आज वरळी डोमवर होणाऱ्या विजयी मेळाव्याकडे लागल्या आहेत. १९ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येत हिंदी सक्तीविरोधातील कायदा रद्द केल्याबाबत विजयोत्सव साजरा करणार आहेत. एकाच व्यासपीठावर येत राज आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र तोफ धडाडणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे? भाषणाची सुरूवात नेमकी कुणापासून केली जाणार? भाषणादरम्यान, ठाकरे बंधू एकीची घोषणा होणार का? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. मात्र, भाषणाबाबत मोठी अपडेट हाती आली आहे.

विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. तब्बल १९ वर्षानंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे या महोत्सवाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सकाळी ११:३० वाजेपर्यंत दोन्ही बंधू वरळी डोमवर पोहोचतील. दरम्यान, या विजयी मेळाव्यात नेमके कोणते नेते भाषण करणार? याची माहिती समोर आली आहे. आजच्या विजयी मेळाव्यात दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. प्रकाश रेड्डी, शेकापचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या नेत्यांची भाषणं होणार आहेत.

जर या विजयी मेळाव्यात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आले तर, त्यांनाही भाषण करण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. सगळ्यांचं भाषण झाल्यानंतर शेवटी उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत. यादरम्यान, लाखोंच्या घरात ठाकरे सैनिक या मेळाव्यात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे वरळी डोममधील जागा अपुरी पडू शकते. डोमच्या बाहेरील हाजी अली, वरळीला जाणारे दोन्ही रस्ते पॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावर देखील स्क्रीन लावली आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून आता ठाकरे सैनिक वरळी डोमच्या दिशेनं प्रस्थान झाले आहे.

विजयोत्सवात ठाकरे मोठी घोषणा करणार?

१९ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र असल्यामुळे साऱ्यांचं लक्ष आजच्या मेळाव्याकडे आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंची युती होईल अशी चर्चा होती. राज ठाकरेंनी दिलेली साद आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देतील हे जवळपास निश्चित झाल्याचं वाटलं होतं. मात्र, अद्यापतरी टाळीचा आवाज घुमला नाही. त्यामुळे मराठीचा झेंडा खांद्यावर घेऊन ठाकरे बंधू इथून पुढची लढाई एकत्र लढणार का? याची उत्सुक्ता सगळ्यांनाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

11 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; दोन डॅशिंग महिला अधिकाऱ्यांना दिली मोठी जबाबदारी

Liver Health : लिव्हर आणि किडनीचं या ७ सवयींमुळे होतं नुकसान; वेळीच सावध व्हा

Hair Fall: शॅम्पू लावताच तुमचे केस गळू लागतात? 'या'५ सवयी ठरतात कारणीभूत

तुरूंगात असताना माझ्यावर विषप्रयोगाचा संशय, राऊतांच्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT