महाराष्ट्र

...तोपर्यंत निवडणुका घेऊच नका, आयोगावर ठाकरे बंधू संतापले, शिवालयमध्ये नेमकं काय झालं?

Raj Thackeray Uddhav Thackeray questions Election Commission over voter list errors : शिवालयमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर संताप व्यक्त केला. मतदार याद्यांतील घोळ आणि पारदर्शकतेच्या अभावावर दोघांनीही तीव्र प्रश्न उपस्थित केले.

Namdeo Kumbhar

Maharashtra voter list controversy before local body polls : मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, अशी संतप्त मागणी राज ठाकरेंनी आयोगाकडे केली आहे. तुम्ही फक्त सत्ताधारी तीन पक्षासाठी काम करू नका. सगळं व्यवस्थित केल्याशिवाय निवडणुका घेता नाही येणार. इतकी वर्षे झाली आता होणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले. मागची यादी आम्ही वापरत आहोत. १ जुलै ही तारीख निश्चित केली होती.यादी तीच वापरत असल्याने नावे डिलीट करणे, बदलणे ही आमच्या अधिकारात नाही, असे आयोगाने सांगितले.

राज ठाकरेंसह मविआच्या शिष्टमंडळानं आज पुन्हा एखदा निवडणूक आयोगाची भेट घेतली. शिवालयमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान राज ठाकरे आयोगावर चांगलेच संतापले. उद्धव ठाकरेंनीही आयोगाला धारेवर धरले. काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तर जितेंद्र आव्हाडने सवाल उपस्थित केले. नेमकं कोण काय काय म्हणाले

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

मतदार याद्याबाबत आम्ही कुणाला बोलायचं? त्रुटीसह जर निवडणुका घ्यायच्या असेल तर निवडणुका कशाला घेता... ड्रायरेक्ट इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका. तुम्ही हुकूमशाही व आम्ही लोकशाही पाळणार का? असे सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. VVPAT तुम्ही घेत नाही, म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट कराल. निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे बैठकीत प्रचंड आक्रमक -

आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. आठ दिवसांची फक्त मुदत देता. निवडणूका कशा लढवायच्या सांगा? क्लिष्ट प्रश्न नाहीत. आमचा मतदारांशी संबंध येतो, तुमचा नाही. ते आम्हाला मतदान करतात. ही पारदर्शकता आहे का? २०२२ ला बेसावध राहिलो. सगळं व्यवस्थित केल्याशिवाय निवडणुका घेता नाही येणार. इतकी वर्षे झाली आता होणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी करता? सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही. मुलीचे वय १३४ व वडिलांचे ४०…कुणी कुणाला काढले? असा संतप्त सवालही राज ठाकरेंनी विचारला.

पण सगळे तुम्हीच ठरवणार का? निवडणूक आम्ही लढवतो व तुम्ही निवडणूक कंडक्ट करता. निवडणुका लढवतं राजकीय पक्ष, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही? असा सवाल राज ठाकरेंनी केला. सर्व राजकीय पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, असेही राज ठाकरे म्हणाले.

मतदार यादीत घोळ असेल तर आम्ही तयार नाही ते तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा. बाळासाहेब थोरात ८ टर्म ८०-९० हजार मतांनी निवडणूक जिंकतात, यंदा लाखाने पडले, हे कसे शक्य असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

थोरात काय म्हणाले ?

आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झाले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी आहेत, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

जयंतराव पाटील काय म्हणाले ?

आमचा आरोप की तुमची वेबसाईट कोण तरी वेगळं माणूस हँडल करतं.

कामठी विधानसभा घर क्रं. ० असे ४०० वोटर आहेत.

नालासोपारा येथील नाव सुषमा यादव, ही खोटी मतदार आहे. आम्ही तिथे गेलो शहानिशा केली. लगेच संध्याकाळी हे नाव काढले.

अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीर मतदार आहे. त्याचा कोणता ठावठिकाणा नाही.

EPIC क्र. वेगवेगळा असायला पाहिजे. बरेच मतदार असे की ज्यांना एकच EPIC क्र.

आम्ही अर्ज केला, जाब विचारलं तर आयोग उत्तर देत नाही

वडेट्टीवारांचे गंभीर आरोप -

देवांग दवे कोण आहे, याची माहिती घ्या

हा माणूस भाजपचा आहे, हा निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अन् इतर मुद्द्यासाठी जाब विचारण्यासाठी मनसे अन् मविआचे शिष्टमंडळाने शिवालयमध्ये निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांची भेट घेतली. या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाला संतप्त सवाल केले. निवडणूक आयोगाला निवदेन देत विरोधकांनी जाबही विचारला. आयोगाकडून मात्र पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आलेय. पुरावे सादर केल्यानंतर आम्ही तपासणी करू असे उत्तर देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hand Trembling: हाथ थरथरणे 'हे' कोणत्या आजाराचे लक्षण आहे? अशी घ्या काळजी

Ginger garlic paste: 'या' पदार्थांमध्ये फोडणीमध्ये चुकूनही आलं-लसूण पेस्ट वापरू नका

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात; ४८०कोटी रुपये वाटपास मंजुरी, कोणत्या जिल्ह्यांना मिळेल मदत

Thurday Horoscope : हितशत्रूंचा त्रास संभवतोय, अडचणी मागे लागतील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात साडेसातीचे संकेत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून ४० किमी अंतरावर आहे सुंदर मंदिर; ८०० वर्ष जुन्या या मंदिराला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT