Sangli Kolhapur Flood Situation Latest Update: Saamtv
महाराष्ट्र

Sangli Kolhapur Flood: सांगलीकरांना दिलासा! 'कृष्णे'च्या पाणी पातळीतील वाढ मंदावली, कोल्हापूरात 'पूराची' स्थिती काय? वाचा..

Sangli Kolhapur Flood Situation Latest Update: सांगलीमध्ये कृष्णा नदीची झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता संथ गतीने कमी होत आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र पूरस्थिती कायम आहे.

विजय पाटील

सांगली, ता. २८ जुलै २०२४

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने नागरिकांचा जीव टांगणीला आला होता. मात्र आता कृष्णाकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला असून कृष्णा नदीची पातळी एकीकडे 5 इंच उतरली असून पाणी स्थिर आहे.

कृष्णाकाठला दिलासा!

सांगलीमध्ये कृष्णा नदीची झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता संथ गतीने कमी होत आहे. कृष्णेची पातळी रात्री 40 फूट 6 इंच होती. ती पातळी 40 फूट 2 इंचावर आहे. रात्रीपासून 4 इंचने पाणी पातळी कमी झाली आहे. मात्र इशारा पातळी ही 40 फूट आहे. यामुळे कृष्णा काठच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आणि नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर ओसरल्यामुळे पातळीत होणारी वाढ मंदावली आहे.

पाणी पातळीतील वाढ मंदावली

जिल्ह्यातील एकूण 4 हजार 62 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर जनावरांचाही स्थलांतर करण्यात आले आहे. या पुरामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामध्ये भात, सोयाबीन, ऊस, आणि भाजीपाला अशी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कोल्हापूरात परिस्थिती काय?

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र पूरस्थिती कायम आहे. रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर आहे. गेल्या आठवड्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे 95 बंधारे अद्यापही पाण्याखाली गेले असूनजिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील सर्वच रस्त्यांवर पुराचे पाणी साचले असून पुराच्या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोलसह इतर कचरा शहरातील रस्त्यांवर साचला असून सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड|VIDEO

Maharashtra Live News Update: बी टी कवडे रस्त्यावर पुन्हा कोयत्याने गाड्या फोडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

Maharashtra Politics: तेव्हा मूग गिळून का बसले होते? खासदार नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Pune : पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ; १३ वर्षीय मुलाचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू, ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय पेटवलं

India W vs South Africa W Final: रिप्लेसमेंट म्हणून आली, फायनलमध्ये चमकली, 'लेडी सेहवाग'ची अंतिम सामन्यात धुव्वाधार बॅटिंग

SCROLL FOR NEXT