Rain Alert in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Heavy Rainfall Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर पाऊस, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर; IMD कडून सतर्कतेच्या सूचना

IMD Rain Alert in Maharashtra Today : येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा आणखीच जोर वाढणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज गुरुवारी पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Satish Daud

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. विदर्भापासून ते मराठवाड्यापर्यंतच्या भागाला पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. मुंबईसह कोकण आणि पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.

त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून धरणक्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यात पावसाचा आणखीच जोर वाढणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. आज गुरुवारी पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD Rain Alert) दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत राज्यात पाऊस कायम राहणार आहे. काही जिल्ह्यांमध्येही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील भंडारा चंदपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

तर कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर (Maharashtra Heavy Rain) वाढण्याची शक्यता असून आज मुंबईला ऑरेंज अलर्ट आहे. पुणे जिल्ह्यातही येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. अकोला, अमरावती, नागपूर भंडारा, ठाणे पालघर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी तसेच धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, पुणे शहरासह परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले आहे.

त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे

भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT