Rain In Akola Saam Tv
महाराष्ट्र

Akola Rain: मुसळधार पावसाने अकोला जिल्ह्याला झोडपलं; २ जणांचा वीज पडून मृत्यू

Rain In Akola: अकोला जिल्ह्यात ११ ते १६ जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस पडले, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलीय. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपलंय. यादरम्यान वीज पडून दोन जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

अकोला : जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. दरम्यान अकोल्यात वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यात घडली. ग्राम खापरवाडा शुभम राजू टापरे वय ३० आणि शालीग्राम श्रीराम डोंगरे वय ६५ वर्षीय असे मरण पावलेल्या व्यक्तींचे नाव आहेत. दोघे जण शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात ११ ते १६ जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये. वीज चमकत असताना मोबाईल, वीजेची उपकरणे बंद ठेवावीत. वाहने वीजेचा खांब व झाडे यापासून दूर ठेवावीत, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह हजेरी लावलेल्या पावसाने सगळीकडे शेतशिवारात पाणीच पाणी तर नाल्यांना जोरदार पाणी वाहू लागले होते. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते. दुष्काळी तालुका म्हणून जाहीर झालेल्या मालेगाव तालूक्यात झालेल्या या मुसळधार पावसाने शेतकरी आनंदित झाले असून शेती कामांना आता वेग येणार आहे.

महाराष्ट्रात आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?

 राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुढील २४ तासांतही राज्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

खामगावात ढगफुटीसदृश्य पाऊस

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सोमवारी मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झालं. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं. तसेच दुकानातही पाणी शिरलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT