rain hits jat taluka, Monsoon Updates, Monsoon News in Marathi  saam tv
महाराष्ट्र

सातारा, सांगली, रत्नागिरी, साेलापूरात मुसळधार; जत पूर्वचा संपर्क तुटला

मान्सूनपूर्व पावसामुळे रत्नागिरीत आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत.

अमोल कलये, विजय पाटील, विश्वभूषण लिमये, भारत नागणे, Siddharth Latkar

सातारा : सातारा (satara), सांगली, रत्नागिरीसह साेलापूर जिल्ह्यात वादळी वा-यासह गुरुवारी रात्री पाऊस झाला. आज (शुक्रवार) सकाळपासून या जिल्ह्यांत पावसाच्या सरी काेसळत आहेत. दरम्यान गुरुवारी झालेल्या पावसामुळे सांगली (sangli) जिल्ह्यात वळसंग ते पाचापुर पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे. हवामान खात्याने साेलापूर तसेच सातारा जिल्ह्यात आज वादळी वा-यासह पावसाची (rain) शक्यता वर्तवली आहे. (Monsoon news in Marathi)

सांगली जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळ पासून पावसाने हजेरी लावली. विशेषत: जत (jat) या दुष्काळी भागात पावसाने जोरदार बॅटिंग केली. यामुळे अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. वळसंग ते पाचापुर पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद झाला आहे. या पुलावरून पाणी गेल्याने जत पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे.

सोलापूर (solapur) शहरात गुरुवारी दुपारपासून मुसळधार पाऊस झाला. गत चोवीस तासात सोलापुरात ३६.१ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे शहरातील विजापूर रोड येथील नेहरू नगर शासकीय मैदानाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान पंढरपूरात (pandharpur) आजही पहाटे पासून पावसाची संततधार सुरु हाेती. येथे गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाच्या (pre monsoon rain) सरी काेसळल्या. दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे अखेरच्या टप्प्यातील आंब्याचे मोठे नुकसान हाेत आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पाऊस पडेल असा हवामान खात्याने इशारा दिला आहे.

दरम्यान आज सातारा आणि साेलापूर जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वा-यासह पाऊस येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी माेठ्या झाडांखाली उभे राहू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT