raigad, raigad news, raigad hits rain saam tv
महाराष्ट्र

Raigad Rain News : रायगडसह खोपोलीत दमदार पाऊस, 'पाताळगंगा' ने ओलांडली इशारा पातळी, अंबा, कुंडलिका दुथडी भरल्या; लाेणावळ्यात चिंताजनक स्थिती (पाहा व्हिडिओ)

सकाळी आठ वाजता लघु पाटबंधारे योजना तालुका तळा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे.

Siddharth Latkar

- सचिन कदम, दिलीप कांबळे

Raigad Rain News : भारतीय हवामान विभागाने 21 जुलैपर्यंत रायगड जिल्हयामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता ऑरेंज अलर्टच्या माध्यमातून वर्तवली आहे. रायगड जिल्हयात पावसाची संततधार सुरु आहे. रायगड जिल्हयातील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच अंबा आणि कुंडलिका नदीची पातळी इशारा पातळी इतकी झाली आहे. (Maharashtra News)

रायगड शहरासह खोपोली, खलापुरमध्ये जोरदार पाऊस काेसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकल भागातील, नदी किनारी राहणाऱ्यांना प्रशासनाने दक्षतेचा इशारा दिला आहे.

याव्यतरिक्त खोपोलीतील लौजी येथील श्रीराम नगरमध्ये पाणी भरल्याने रहिवाशांना गुढघाभर पाण्यातून ये जा करावे लागत आहे. पहाटे शाळेतील मुल व कामाला जाणारे व्यक्ती यांना पाण्यातून ये जा करावी लागली. येथील रस्ता हा पूर्णपणे पाण्यात गेला असून आणखी पाऊस झाला तर घरातही पाणी जाऊ शकते अशी चिंता रहिवाशांना लागली आहे.

रायगड जिल्हयातील पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच अंबा आणि कुंडलिका नदीची पातळी इशारा पातळी इतकी झाली आहे.

दरम्यान साेमवारी पेण येथील नदीत दोन जण बुडाले. हे दोघे ही रेवदंडा (revdanda) येथील असुन सख्खे भाऊ असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना पेण तालुक्यातील पाबळ येथे घडली.

लोणावळ्यात गतवर्षी पेक्षा कमी पाऊस

पर्यटन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस (Lonavala Rain Update) कोसळला आहे. गेल्या चोवीस तासांत इथं तब्बल 214 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असं असलं तर यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊल हा गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2515 मिलीमीटर पाऊस बरसला होता. यंदा मात्र केवळ 1524 मिलीमीटर इतकाच पाऊस कोसळला आहे. जी चिंतेची बाब आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT