Satara News : सरकारी तिजाेरी रिकामी? मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात शासकीय ठेकेदारांचे उपाेषण सुरु

या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटदार सामील झाले होते.
Satara, aandolan
Satara, aandolansaam tv
Published On

Satara News : सातारा जिल्ह्यातील बांधकाम विभागातील शासकीय कंत्राटदारांनी आजपासून (साेमवार) तीन दिवसीय साखळी उपोषणाला बांधकाम भवन येथे प्रारंभ केला आहे. दरम्यान राज्य शासनाने तातडीने मागणीचा विचार करवा अन्यथा आपत्ती काळात बांधकाम विषयक काेणत्याही संघटना सरकारला सहकार्य करणार नाहीत असा इशारा विविध संघटनेने दिला आहे. (Maharashtra News)

Satara, aandolan
Sangli Accident News : सांगलीवाडी टोल नाका ऑफिसला धडकली बस, 16 प्रवासी जखमी

शासनाच्या विविध योजनांच्या कामाची थकीत बिल मिळावी म्हणून हे आंदोलन सुरू केले आहे अशी माहिती आंदाेलकांनी दिली. कोव्हिड काळापासून आतापर्यंत झालेली विविध कामांची संपूर्ण बिले आज पर्यंत मिळाली नसल्याने कंत्राटदार आक्रमक झाले होते.

Satara, aandolan
Praniti Shinde News : ते आपल्या रक्तावर राजकारण करुन सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतील, सावध रहा ! प्रणिती शिंदेंचा माेदींवर घणाघात

लवकरात लवकर बिले निघाली नाहीतर आपत्ती व्यवस्थापनाचा काळात कोणतीही मदत करणार नसल्याचा इशारा (satara) बिल्डर असोसिएशनने देण्यात आला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटदार सामील झाले होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com