jintur saam tv
महाराष्ट्र

Parbhani Rain News : जिंतूरला पावसाला झाेडपले, सणासुदीच्या काळात पाेलीस वसाहतीत चिखलाचा राडाराेडा

पोलीस कर्मचाऱ्यांची घरे मोडकळीस आली आहेत. जीव मुठीत धरून कर्मचारी राहत आहेत.

राजेश काटकर

Jintur News : जिंतूर शहरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाने आगमन केले. बघता पाणीच पाणी झाल्याने शहरातील पोलीस वसाहतीच्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांमध्ये नालीचे घाण पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांच्या वतीने संताप व्यक्त केला जात होता. (Maharashtra News)

परभणी शहरासह जिल्हात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. सेलू, जिंतूर, मानवत व पाथरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस सेलू व जिंतूर तालुक्यात पडल्याने नदी, नाले ओढे हे पावसाळ्यात पहिल्यांदाच प्रवाहित झाले. या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटला आहे.

जिंतूर शहरात नालीचे पाणी शहरातील पोलीस वसाहतीत असलेल्या अनेक पोलीस कर्मचा-यांच्या घरात सणासुदीच्या काळात शिरले. यामुळे घरात घाणे घाण झाली हाेती. तसेच वसाहतीत छोटे मंदिर असून त्या परिसरात देखील नाल्यांचे पाणी साचले. संपुर्ण परिसरात गुडघा भर पाणी साचल्याने नागरिकांना घाण पाण्यातून ये जा करावी लागली. त्यातच घाणीचे पाणी साचल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार निघाली चोर, बॉयफ्रेंडच्या मदतीने करायची महिलांच्या पर्स लंपास

Maharashtra Live News Update: पुण्यात मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

Maharashtra Politics: रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं विरोधकांची कोंडी, शिंदेसेनेविरोधात चव्हाणांची रणनीती काय?

IND vs SA ODI: क्विंटन डी कॉकच्या विकेटनंतर कोहलीचं भन्नाट सेलिब्रेशन; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय कृषीमंत्री-मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद? राज्याने केंद्राला अतिवृष्टीचा प्रस्ताव पाठवला की नाही?

SCROLL FOR NEXT