IMD Predict Mumbai Heavy Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : मुंबई, पुण्याला आज पावसाचा यलो अलर्ट; ४ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, उर्वरित राज्यात कशी असेल स्थिती?

Rain Forecast : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे.

प्रविण वाकचौरे

Maharashtra Rain Update :

राज्यात ऑगस्ट महिन्यात गायब झालेला सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पुन्हा अॅक्टिव्ह झाला आहे. मागील काही दिवसांपासून काही भागांत कोसळणारा पाऊस आज म्हणजेच १५ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे.

आजपासून राज्यात पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. आज राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.

आज विदर्भातील ४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, पुणे, ठाण्यासह २६ जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे

आजपासून विदर्भात पाऊस सक्रीय होणार असल्याचा अंदाज आहे. भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.

यलो अलर्ट असलेले जिल्हे

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections: मुंबई महानगरपालिका निवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Politics: मोठी बातमी, अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, अजितदादांची घोषणा

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; भाच्याने केला अजित पवार गटात प्रवेश

Monday Horoscope : भगवान महादेवाची कृपा होणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळलं |VIDEO

SCROLL FOR NEXT