IMD Predict Mumbai Heavy Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : पुढील ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार?; आज ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rain Update in Maharashtra : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Rain News : मुंबईत काल पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साठल्याच्या घटना समोर आल्या आहे. राज्यातील इतर भागांमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. हवामान विभागाने आज ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला होता.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित व वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांत महाराष्ट्रात पावसाचा जोर (Heavy Rain)  वाढण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजनुसार, आज पुण्यासह ५ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ७ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १४ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Latest News)

कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट

रेड अलर्ट असलेल्या पुणे, सातारा, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यात ऑरेंज अलर्टमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra News)

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबईत गेल्या ६ तासांत ( संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत) अत्यंत तीव्र पावसाची नोंद आहे. दुपारपासून ७०-१०० मिमी पाऊस झाल्याचा अंदाज आहे. पुढील ३-४ तास पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT