Rain Alert Saam Digital
महाराष्ट्र

Rain Alert : उत्तर भारतातून मान्सूनची माघार, दक्षिण भारतात मात्र पावसाळा; या भागात पुढचे ५ दिवस पावसाची शक्यता

IMD Rain Alert : उत्तर भारतातून आज मान्सूनने पूर्णपणे (१५ ऑक्टोबर) माघार घेतली. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण भारतात पावसाळ्याचा अनुभव येत आहे.

Sandeep Gawade

उत्तर भारतातून आज मान्सूनने पूर्ण (१५ ऑक्टोबर) माघार घेतली आहे. उत्तर भारतात आता आकाश निरभ्र असलं तरी दक्षिण भारतात पावसात मात्र नवीन पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि पूर्व व उत्तर-पूर्व दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.

दक्षिण बंगालच्या उपसागरात मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तामिळनाडू आणि पुदुचेरी, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि केरळ येथे हलक्या ते मध्यम पावसासह अनेक ठिकाणी पाऊस झाला असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.

माॅन्सूनने यंदा सरासरी वेळेपेक्षा उशीराने परतीचा प्रवास सुरू केला. माघारी मान्सूनचा २३ सप्टेंबर पासून परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर अनेक दिवसांचे मुक्काम करत अखेर आज माॅन्सूनने देशाचा निरोप घेतला. मान्सूनचा परतीचा प्रवास उशीरा सुरु झाला तरी माॅन्सूनने वेळेत देशाचा निरोप घेतला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी निरोप घेतल्यानंतर आज दक्षिण द्विपकल्पात ईशान्य मान्सून सक्रिय झाला.

हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. आज कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. गुरुवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

शुक्रवारी राज्यातील आणखी काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Tourism : दगडी पायऱ्या अन् भव्य प्रवेशद्वार; नाशिकमधील 'हे' ठिकाण ट्रेकर्ससाठी खास आकर्षण

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करु नये? जाणून घ्या

Pune MHADA : पुणेकरांसाठी आनंदवार्ता! ४१८६ म्हाडाच्या घरांची उद्या सोडत; कुठे आणि कशी होणार? वाचा सविस्तर

Bigg Boss Marathi 6 : ओमकार राऊतने बिग बॉसच्या घराला केले टाटा, बाय बाय; शक्ती अन् युक्ती दोन्ही पडली कमी, पाहा VIDEO

Zilla Parishad Election Result 2026 LIVE Updates : मिनी मंत्रालयाचा फैसला आज; १२ जिल्ह्यांत कुणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT