Rain SaamTv
महाराष्ट्र

Weather Forecast : दिवाळीआधी पाऊस हजेरी लावणार? राज्यातील या जिल्ह्यांना ३ दिवस पावसाचा इशारा

Rain Alert in Maharashtra : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

प्रविण वाकचौरे

Rain Forecast News :

राज्यात दिवसा ऑक्टोबर हिटचा तडाखा आणि रात्री गारवा असा अनुभव नागरिकांना येत आहे. यात आता पावसाची भर पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकण किनारपट्टीवर 3 दिवस मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे पुढील 3 दिवस गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील तापमानात मागील काही दिवसांपासून चढ उतार होत आहेत. सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला होता.

त्यानुसार कराड तालुक्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे ऊसतोडीवर परिणाम झाला आहे. मात्र हा पाऊस रब्बी पिकांसाठी पोषक असल्याने शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज

उद्या म्हणजे ६ नोव्हेंबर रोजी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. बुधवारी सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात रिमझिम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT