Maharashtra Today Weather News Saam Tv
महाराष्ट्र

Rain Alert: मुंबईसह ठाणे अन् पालघरला पाऊस झोडपून काढणार, १० जिल्ह्यांना अलर्ट जारी; कुठे कसं हवामान?

Maharashtra Today Weather News: राज्यात पावसाचा हाहाकार सुरूच आहे. आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. १० जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Priya More
  • राज्यात आजही मुसळधार पावसाचा असणार आहे

  • रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

  • मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिल्ह्यांना येलो अलर्ट

  • कोकण आणि घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

राज्यामध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत चालली आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा कायम आहे. याठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस पडत आहे. पुढचे काही दिवस देखील राज्यासाठी महत्वाचे असणार आहेत. आज पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. या ठिकाणांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावली असली तरी गेल्या १५ ते २० दिवसात झालेल्या पावसामुळे ती भर भरून काढली. या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला. त्याचसोबत बळीराजा देखील सुखावला.

आज रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. तसंच तापमानातही लक्षणीय घट झालेली असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! शिपायापासून सचिवांपर्यंत किती असेल पगार?

Bathroom mirror cleaning: आरशावरचे हट्टी डाग कसे काढाल? या 5 टीप्सने होईल आरसा होईल चकचकीत

Maharashtra Politics: शिवसेनेत खलबतं! एकनाथ शिंदे मंत्र्यांवर नाराज, तातडीची बैठक बोलावत दिली तंबी

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

SCROLL FOR NEXT