Rain Alert Saam Digital
महाराष्ट्र

Rain Alert : कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार, जनजीवन विस्कळीत; पूल, रस्त्ये खचले, 14 वर्षांचा मुलगा गेला वाहून

IMD/Rain News : राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. अमरावतीत १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला आहे. तर गोठा कोसळून ४ जणावरांचा मृत्यू झाल आहे.

Sandeep Gawade

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई परिसर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊसाने थैमान घातलं आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी पूल, रस्त्ये खचले आहेत. त्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. अमरावतीत अंबा नाल्याला आलेल्या पुरात १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला आहे. घटनास्थळी रेस्क्यू पथक दाखल झालं असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. परवेज खान अफरोज खान असं पुरात वाहून गेलेल्या मुलाचं नाव आहे.

पुण्याच्या भोर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. आज आंबवडे खोऱ्यातील जेधेवाडी येथे जनावरांचा गोठा कोसळून १ म्हैस ठार झार झाली आहे, तर चार जनावरं गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेत शेतकरी संभाजी दत्तात्रय जेधे यांचं सुमारे 3 ते 4 लाखांचं नुकसान झालं आहे.तर अमरावती शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यानअमरावती शहरातील लालखडी परिसरातील अंबा नाल्याला आलेल्या पुरात १४ वर्षांचा मुलगा वाहून गेला आहे. घटनास्थळी रेस्क्यू पथक दाखल झालं असून शोधकार्य सुरू आहे. नाल्यानजीक खेळायला त्याचा तोल जाऊन तो नाल्यात पडला होता.

कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे व दिवाणखवटी स्टेशन दरम्यान बोगद्याजवळ ट्रॅकवर माती आल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ट्रॅकवरील माती बाजूला करण्याचं काम सुरू आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी ५ ते ६ तास लागण्याची शक्यता आहे. दुरांतो एक्स्प्रेस माणगाव रेल्वे स्थानकात रखडली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वाडा - मनोर मार्गावरील वरले नजीक पावसाचं पाणी साचलं आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने व रस्त्यावर खड्डे पडल्याने रुग्णवाहीका अडकून पडली होती. स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहीका बाहेर काढली. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडा या गावात दीड तास मुसळधार पाऊस कोसळ आहे. त्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरलं आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिक उघड्यावर आले आहेत. मुसळधार पावसामुळे शेतपीकाचंही मोठं नुकसान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT