Sangameshwar : गणपतीला कोकणात गावी गेलाय? संगमेश्वरजवळील 'ही' ५ ठिकाणे फिरायला अजिबात चुकवू नका!

Shreya Maskar

मार्लेश्वर धबधबा

मार्लेश्वर धबधबा हिरव्यागार सह्याद्रीच्या टेकड्या आणि खेळकर माकडांनी वेढलेला आहे. हे ठिकाण एका प्राचीन गुहा शिवमंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

Marleshwar Falls | google

प्रचितगड किल्ला

प्रचितगड किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगांमध्ये खोलवर वसलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. जो इतिहासप्रेमी आणि निसर्गरम्य दृश्यांच्या शोधात ट्रेकिंगसाठी खास ओळखला जातो.

Prachitgarh Fort | google

आरे-वारे बीच

आरे वारे बीचवरून अरबी समुद्राची चित्तथरारक दृश्ये पाहायला मिळतात. आरे-वारे बीच हा शांत आणि जुळे समुद्रकिनारे आहेत.

Aare-Ware Beach | google

भवानीगड किल्ला

भवानीगड संगमेश्वरजवळ असलेला एक छोटा ऐतिहासिक किल्ला आहे. जो एका दिवसाच्या सहलीसाठी सोपा ट्रेकिंग स्पॉट आहे.

Bhawanigarh Fort | google

निवे धरण

निवे धरण देवरुखजवळ असलेले एक शांत जलाशय आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य खुलते. या परिसरात इंद्रधनुष्याचा सुरेख नजारा पाहायला मिळतो.

Nive Dam | google

बामनकडा धबधबा

बामनकडा धबधबा हा पिरांडवणेजवळ असलेला एक निसर्गरम्य हंगामी धबधबा असून पावसाळ्यात खळखळणाऱ्या पाण्यासाठी ओळखला जातो.

Bamankada Falls | google

धामपूर धबधबा

पर्यटकांच्या गर्दीपासून दूर, शांत आणि सुंदर धबधबा शोधत असाल तर धामपूर धबधबा बेस्ट ऑप्शन राहिल. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.

Dhampur Falls | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

India | AI PHOTO
येथे क्लिक करा...