Weather Update 13 February 2024 Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना आज पावसाचा अलर्ट; मराठवाडा-विदर्भात तुफान पाऊस कोसळणार

Satish Daud

अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय. पुढील 3-4 दिवस पावसाची अशीच स्थिती कायम राहणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (ता. 24) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरातही आज पावसाचे पुनरागम होणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, कल्याण, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाताना काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे नाशिक, जळगाव, नंदुरबार, या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी छत्री-रेनकोर्ट घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT