कोकण रेल्वे मार्गावर अपघात: राजधानी एक्सप्रेसच्या इंजिन चाक घसरले  Saam Tv
महाराष्ट्र

कोकण रेल्वे मार्गावर अपघात: राजधानी एक्सप्रेसच्या इंजिन चाक घसरले

हजरत निजामुद्दीन- मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरल्याने, कोकण रेल्वे मार्गावर अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमोल कलये

रत्नागिरी : हजरत निजामुद्दीन- मडगाव Madgaon राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरल्याने, कोकण Konkan रेल्वे मार्गावर अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इंजिन Engine बाजूला करण्याचे काम पूर्ण झाले, असून काही तास ठप्प राहिलेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. Railway services disrupted as engine derails near ratnagiri

रत्नागिरी Ratnagiri जिल्ह्यातील उक्षी व भोके दरम्यान, करबुडे बोगद्यामध्ये पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त राजधानी एक्स्प्रेस गोव्याच्या दिशेने निघालेली होती. मुंबई Mumbai पासून ३२५ किलो मीटरवर असलेल्या, करबुडे बोगद्यातील रेल्वे Railways ट्रॅकवर दरड कोसळल्याने इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरले आहे.

हे देखील पहा-

या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे दुरुस्ती वाहन व वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेले वाहन रत्नागिरीहून घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघात बोगद्यात झाला असल्याने, कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. इंजिन रुळावरून बाजूला करण्याच काम पूर्ण झाल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली आहे. जवळच्या स्थानकावर थांबवण्यात आलेल्या, गाड्याही मार्गस्थ झाले आहेत, याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली आहे. Railway services disrupted as engine derails near ratnagiri

रायगड Raigad मधील रोहा ते कर्नाटकातील मँगलोर दरम्यानच्या ७५६ किलो मीटर मार्गावर ही कोकण रेल्वे धावत असते. महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक अशा ३ राज्यांमधून गेलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक नद्या, खोल दऱ्या व टेकड्या आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत आव्हानात्मक मानला जात. यावर्षी पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावर अपघाताच्या छोट्या- मोठ्या घटना घडतच असतात.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT