रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत विकास गोगावलेंचा विजय
या निकालामुळे राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का
विकास गोगावले पहिल्यांदाच निवडणूक लढवत विजयी झाले
विजय होताच महाडमध्ये समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला. महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांचा विजय झाला. महाड नगरपरिषद निवडणुकीमध्ये विकास गोगावलेंनी प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत विजय मिळवला. विकास गोगावले यांचा विजय होताच गोगावले यांच्या समर्थकांनी गुलाल उधळ एकच जल्लोष केला. सध्या महाडमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महाड तालुक्यातील नाडगावतर्फे बिरवाडी मतदारसंघात यावेळी चांगलीच लढत पाहायला मिळाली. भरत गोगावले यांचा मुलगा आणि युवासेनेचे सचिव विकास गोगावले पहिल्यांदाचा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या निवडणुकीमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मतदानाच्या दिवशी जोरदार राडा झाला होता. दोन गटात हाणामारी झाली होती.
या प्रकरणी भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावलेंसह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे सर्वजण फरार झाले होते. पण त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारला झापल्यानंतर हे सर्वजण महाड पोलिस ठाण्यात हजर झाले होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. आता या निवडणुकीमध्ये विकास गोगावले यांचा विजय झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.