Raigad  saam tv
महाराष्ट्र

Raigad : दुचाकीने अचानक घेतला पेट; प्रसंगावधान राखल्याने चालकासोबत चिमुकली बचावली

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली नांदगाव रस्त्यावर वावळोली गावाजवळ दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad Accident News : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली नांदगाव रस्त्यावर वावळोली गावाजवळ दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आज, सोमवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या घटनेची नोंद रायगडमधील पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड (Raigad) जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली नांदगाव रस्त्यावर वावळोली गावाजवळ दुचाकीवरून चालक आणि एक चिमुकली चालले होते. मात्र, रस्त्यावर दुचाकी रस्त्यावर अचानक बंद पडली. त्यामुळे दुचाकी पुन्हा सुरू करण्याकरिता स्टार्टरचे बटण दाबले असता दुचाकीने अचानक पेट घेतला.

प्रसंवाधान दाखवत दुचाकीस्वार आणि सोबत असलेली चिमुकली सुरक्षित अंतर दूर गेली. त्यानंतर काही कळायच्या आत ही आग भडकली आणि क्षणार्धात दुचाकी जळून खाक झाली आहे. या घटनेची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बनावट रक्त चाचणीचे अहवाल देऊन विमा कंपनीची फसवणूक

Pune Crime: पुणे स्टेशनवर जबरी चोरीचा थरार! पैसे न दिल्याने पोटात भोसकला चाकू

PM मोदींसह आईचा AI व्हिडिओ पोस्ट केला, आता पोलिसांची मोठी कारवाई; काँग्रेससह आयटी सेलवर गुन्हा

India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊ शकतो का? BCCI ला अधिकार आहे का, काय आहे नियम? जाणून घ्या!

Sharad Pawar : वाटेल ती किंमत मोजू, पण...; सामाजिक ऐक्यावर शरद पवारांचं नाशकात महत्वाचं विधान

SCROLL FOR NEXT