3 Youth Drown at Shrivardhan Beach Saam Tv
महाराष्ट्र

Raigad News: श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू, २ सख्ख्या भावांनी गमावला जीव

3 Youth Drown at Shrivardhan Beach: रायगडच्या श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. तिघेही श्रीवर्धननजीकच्या गोंडघर गावात राहणारे होते.

Priya More

सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. श्रीवर्धनच्या वेळास समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली. पोहण्यासाठी तिन्ही तरुण समुद्रात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही समुद्रात बुडाले. स्थानिक नागरिकांनी या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिघांनाही बाहेर काढले पण तोपर्यंत उशिर झाला होता. तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या श्रीवर्धननजीकच्या गोंडघर गावातील ३ तरुण आज सकाळी श्रीवर्धनच्या वेळास समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. हे तिघेही समुद्रात पोहण्यासाठी उतरले. या ३ तरुणांमध्ये दोघे जण सख्खे भाऊ होते. तिन्ही तरुणांना समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही. लाटांनी समुद्रात खेचल्यामुळे तिघेही समुद्रात बुडाले. नाका-तोंडात पाणी जाऊन तिघांचाही मृत्यू झाला.

स्थानिक तरुण आणि वॉटर स्पोर्ट्स चालकांच्या मदतीने बुडालेल्या या तिन्ही तरुणांचा शोध घेण्यात आला. तिघांनाही त्यांनी बाहेर काढले. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तरुणांच्या कुटु्ंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. एकाच गावातील ३ तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे गोंडघर गावावर शोककळा पसरली आहे.

मयुरेश संतोष पाटील (वय २३ वर्षे), अवधुत संतोष पाटील (वय २६ वर्षे) या दोन सख्ख्या भावांचा मृतांमध्ये समावेश आहे. दोघेही श्रीवर्धन तालुक्यातील गोंडघर गावामध्ये राहणारे होते. हिमान्शु पाटील (वय २१ वर्षे) याचा देखील मृत्यू झाला. हिमान्शु नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये राहत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT