Raigad Corona Update: एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad Corona Update: एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

सर्वांची प्रकृती स्थिर, कोणतीही लक्षणे नाहीत; सर्वजण होम आयसोलेशनमध्ये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - महाड तालुक्यातील विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील 15 विद्यार्थी आणि 2 शिक्षकाना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. शाळेत एक कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थी आला होता. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची अँटीजन चाचणी करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर (Nitin Bavlekar) यांनी अशी माहिती दिली आहे. (Raigad sutdent and Teacher Corona Positive)

हे देखील पहा -

महाड (Mahad) तालुक्यातील विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 15 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा समावेश आहे. शाळेतील एक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मिळून 238 जणांची अँटीजन चाचणी (Corona Test) करण्यात आली. त्यातून हा अहवाल समोर आला आहे. सर्व विदयार्थी हे पाचवी ते दहावी वर्गातील आहेत. तालुका आरोग्य अधिकारी नितीन बावलेकर यांनी ही माहिती दिली आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. हे सर्वजण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT