raigad hotel video  Saam Tv
महाराष्ट्र

Video : ग्राहकांनी भरलेल्या हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; एक कर्मचारी जखमी, रायगडमधील घटना

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad : रायगडमधून मोठी बातमी हाती आली आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. या गॅस सिलेंडर स्फोटात हॉटेल कर्मचारी जखमी झाला आहे. या स्फोटामध्ये हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेने हॉटेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड (Raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी दुपारी हॉटेल (Hotel) ग्राहकांनी भरलेले असताना हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या हॉटेलमधील कर्मचारी जखमी झाला आहे. हॉटेल सी विंड असे दुर्घटनाग्रस्त हॉटेलचे नाव आहे. या हॉटेलमध्ये स्फोट झाल्यानंतर हॉटेलमधील ग्राहकांमध्ये एकच धावाधाव झाली.

हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर उपस्थितांनी या घटनेची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कळवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. सिलेंडरचा स्फोटानंतर निर्माण झालेल्या परीस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.

सिलेंडरच्या स्फोटानंतर ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर या गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर हॉटेलचं मोठं नुकसान झालं आहे. सिलेंडरच्या स्फोटानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमा झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रायगडमधील महाड MIDC तील मल्लक स्पेशालीटी या कारखान्याला भीषण आग लागली होती. कारखान्यातील ईओ प्लांटला ही आग लागली होती. आगीचा धुराचे लोट दूरवर दिसल्याने परीसरात घबराट निर्माण झाली होती. मात्र, ही आग नेमकी कशी लागली हे याबाबत माहिती मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी गडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

SCROLL FOR NEXT