Raigad Political News Saam
महाराष्ट्र

रायगडमध्ये अजित पवारांना धक्का! बडे नेते भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिंदे गटात दाखल

Raigad Political News: स्नेहल जगताप यांच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. अजित पवारांना धक्का. शिंदे गटाला बळकटी.

Bhagyashree Kamble

  • महाडमध्ये अजित पवारांना धक्का.

  • भरत गोगावलेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश.

  • शिंदे गटाला बळकटी.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच रायगडमधील राजकारण अधिक तापलं आहे. भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यातील पालकमंत्रिपदाबाबतचा तिढा कायम असताना महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. स्नेहल जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

स्नेहल जगताप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला राम राम ठोकत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत त्यांच्या काही कार्यकर्त्यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, आता स्नेहल जगताप यांचे समर्थक आणि रोहिदास नगर येथील कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रमोद महाडिक, व्यापारी प्रवीण चांदोरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सोमवारी संध्याकाळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश शिवसेनेला बळकटी देणारा मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्याच आलं होतं. एकूण ३४ जिल्हा परिषद अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं. यादी जाहीर होताच प्रत्येक पक्षानं आता कंबर कसली आहे. पक्ष बळकटीसाठी तसेच कार्यकर्त्यांना नेत्यांकडून कानमंत्र दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT