जेवणासाठी बुलेटवरून निघाले, वाटेत भयंकर घडलं, टँकरच्या धडकेत ३ उच्चशिक्षित तरुणांचा मृत्यू

Greater Noida Tragedy: ग्रेटर नोएडामध्ये भयंकर घडलं. बुलेटची पाण्याच्या टँकरशी धडक. तिघांचा जागीच मृत्यू.
Greater Noida Tragedy
Greater Noida TragedySaam
Published On
Summary
  • उच्चशिक्षित विद्यार्थी बुलेटवरून जेवायला जात होते.

  • पाण्याच्या टँकरला धडक.

  • तिघांचा दुर्देवी मृत्यू.

ग्रेटर नोएडास्थित बीटा - २ पोलीस स्टेशन हद्दीत एक भंयकर अपघाताची घटना घडली आहे. चुहडपुर अंडरपासजवळ बुलेट मोटारसायकलवरून जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना पाण्याच्या टँकरनं धडक दिली. या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

गाझियाबाद येथील पंचवटी कॉलनीतील स्वयंम सागर, गाजीपूरचा कुश उपाध्याय आणि बरेली येथील सॅटेलाइट कॉलनीतील समर्थ पुंडीर असे मृत तरूणांची नावे आहेत. तिघेही गौतम बुद्ध विद्यापीठातील बी.टेक साईंसचे विद्यार्थी होते.

Greater Noida Tragedy
गर्भवती बायकोला भेटायला सासरी जात होता, दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; रस्त्यावर सोडले प्राण

रविवारी सायंकाळी ५ वाजवण्याच्या सुमारास तीन विद्यार्थी जीबीयूहून निंबस सोसायटीला जेवणासाठी बुलेट गाडीनं जात होते. त्यापैकी कुणीही हेल्मेट घातले नव्हते. चुहडपुर अंडरपासजवळ येताच बुलेटची पाण्याच्या टँकरशी टक्कर झाली. तिघेही रस्त्यावर पडले.

Greater Noida Tragedy
रत्नागिरीत मनसेला धक्का; बडा नेता भाजपच्या गळाला लागला, शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश होणार

रक्तबंबाळ अवस्थेत तिघेही वेदनेनं तडफडत होते. स्थानिकांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. तिघांना जवळील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती मिळताच पीडितांचे नातेवाईक रूग्णालयात पोहोचले. दोन विद्यार्थ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, एकाचा दुसऱ्या रूग्णालयात हलवण्यात आल्यानंतर मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com