तटकरे यांच्या जवळचा नेत्यानं यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
भरत गोगावले यांचा राष्ट्रवादीला मोठा धक्का.
महायुतीत पुन्हा फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील महायुतीलमधील रस्सीखेच सर्वांनाच माहिती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील स्पर्धा महायुतीला नेहमीची डोकेदुखी वाढवणारी. राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांच्यातील राजकीय वैराने आता एक पाऊल पुढे गेलंय. गोगावले यांनी राजकीय डाव खेळत तटकरे यांना जबरदस्त धक्का दिलाय. यामुळे महायुतीत फुट फडण्याची शक्यता आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांपूर्वी महायुतीत फोडाफोडीचं राजकारण तापलंय. सर्वत्र तिन्ही पक्ष एकमेकांचे आजी -माजी नेत्यांना फोडत आहेत. भाजपने सोलापुरात फिल्डिंग लावत राष्ट्रवादीला धक्का देण्याची तयारी केलीय दुसरीकडे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीला मोठा झटका दिलाय.
खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे सक्रीय कार्यकर्ते विकास गायकवाड यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणलाय. गायकवाड यांच्या प्रवेशाने रायगडमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. दरम्यान गायकवाड यांच्या पक्ष प्रवेशावेळी गोगावले यांनी मोठं विधान केलंय. पुढील काळातही कदाचित तटकरे यांना धक्के मिळतील असे संकेत त्यांनी यावेळी दिलेत. राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास जिल्ह्याचं चित्रच बदलू शकतं, असं विधान केलंय.
विकास गायकवाड हे सुनील तटकरे यांचे विश्वासू शिलेदार मानले जात होते. त्यामुळे गायकवाड यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे तटकरे यांच्यासाठी थेट वैचारिक आणि संघटनात्मक हादराच आहे. मात्र शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीत सुरू झालेलं फोडाफोडीच्या राजकारण महायुतीसाठी धोकादायक ठरणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.