Devendra Fadnavis and Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेनेचा भाजपवर भरवसा नाय काय? शिंदेंच्या मंत्र्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Raigad Politics: शिवसेना ठाकरे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजपबाबत मोठं विधान केले. भाजप कधी कुणाशी युती करेल सांगता येत नाही, असे ते म्हणाले. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

Priya More

Summary -

  • मंत्री भरत गोगावले यांचे भाजपवर थेट आरोप

  • रायगड जिल्हा परिषद निवडणुकीवरून वाद उफाळला

  • शिवसेना शिंदे गटाचा ‘एकला चलो रे’ निर्णय

  • महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर

रायगडमधील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडमधील शिवसेना आणि भाजप यांच्यतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. 'भाजपवाले कधी कुणाशी युती करतील सांगता येत नाही.', असे विधान त्यांनी केले. जिल्हा परिषद निवडणुकीतील युतीवरून त्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

'शिवसेनेचा भाजपवर भरवसा नाय काय? असा प्रश्न आता रायगडमध्ये विचारला जाऊ लागला आहे. कारण इथले भाजपवाले कुणाशी कधी युती करतील हे सांगता येत नाही.' असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केले. जिल्हा परिषद निवडणुकीतील युतीबाबत त्यांनी हे विधान केले. शिवसेना- भाजपची युती करा असे वरिष्ठांचे आदेश आहेत. परंतू इथले भाजपचे नेते आहेत त्यांना आमच्या गोष्टी पसंत नसाव्यात. त्यामुळे ते वरिष्ठांचे आदेश मानतात की नाही? असा प्रश्न गोगावले यांनी उपस्थित केलाय.

तसंच, रायगडमध्ये शिवसेना शिंदे गटाने एकला चलो रेचा नारा दिला आहे. भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण देखील भरत गोगावले यांनी सांगितले. 'रायगडमधील भाजप नेते आमच्याशी चर्चा करतात. त्यानंतर दोन दिवसात दुसऱ्यांशी चर्चा करतात आणि त्यांच्या युती होतात . त्यामुळे दक्षिण रायगडमध्ये आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला.', असल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer Death: प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत

Crime: मध्यरात्री गॅरेजमध्ये घुसले, पेट्रोल टाकून तरुणाला जिवंत पेटवलं; मृत्यू होईपर्यंत तिथेच थांबले

BCCI central contract: BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून A+ कॅटेगिरी करणार सस्पेंड? विराट-रोहितच्या निर्णयामुळे होणार मोठा बदल

Ladki Bahin Yojana : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर लाडकीची संख्या घटणार, महत्त्वाचं कारण आले समोर

SCROLL FOR NEXT