Bharat Gogawale Likely to Become Raigad Guardian Minister साम टीव्ही मराठी (AI Image)
महाराष्ट्र

रायगडला मिळणार नवा पालकमंत्री! आमदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ, 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब?

Bharat Gogawale Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. महायुतीचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची दोन ते चार दिवसांत पालकमंत्री म्हणून नियुक्ती होणार असल्याचा दावा केला आहे.

Namdeo Kumbhar

सचिन कदम, रायगड प्रतिनिधी

Bharat Gogawale likely to become Raigad Guardian Minister : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या दोन ते चार दिवसांत शिवसेना आमदार भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी निवड होणार असल्याचा मोठा दावा महायुतीचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. या दाव्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनीही दुजोरा दिला आहे, असे थोरवे म्हणाले. "आता महायुतीत कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एका मताने हा निर्णय घेतला आहे. राज्यात ज्याप्रमाणे महायुती सरकार एकत्र काम करत आहे, तसेच रायगडमध्येही भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय (RPI) एकत्र येऊन आगामी सर्व निवडणुका लढवतील," असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला.

आ. महेंद्र थोरवे नेमकं काय म्हणाले?

महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी विधान परिषद निवडणुकीदरम्यान एकत्र बसून रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांची रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून अधिकृत निवड केली जाईल. या निर्णयाला पक्षाचे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी पूर्ण पाठिंबा व दुजोरा दिला आहे.

भरत गोगावले यांची निवड तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडून एका मताने होत असल्याने आता महायुतीत कोणतेही मतभेद उरलेले नाहीत. राज्यात ज्याप्रमाणे महायुती एकत्र काम करत आहे, त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषद व आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय (RPI) हे सर्व घटकपक्ष एकत्र मिळून काम करतील, असे थोरवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद

Rain Alert : राज्यात धो धो पाऊस कोसळणार, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याला मध्यरात्री अटक, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

Bhandara Bandh : मोठी बातमी! आज 'भंडारा बंद'ची हाक; नेमकं कारण काय? पाहा काय उघडं अन् काय बंद राहणार

एका निर्णयामुळे वाचू शकतात हजारो रुग्णांचे प्राण! विनोद तावडेंनी मांडला 'हा' अत्यंत महत्त्वाचा मुद्दा...

SCROLL FOR NEXT