विकास मिरगणे
कर्जत (रायगड) : आदिवासी भागात आजही आरोग्य सेवेचा बोजबारा उडालेला पाहण्यास मिळत आहे. गावांपर्यंत आरोग्य सेवा किंवा जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने येथील आदिवासी बांधवांची परवड थांबलेली नाही. कारण रुग्णाला उपचारासाठी ऍम्ब्युलन्स नाही तर झोळीत टाकून हा खडतर प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. कर्जतच्या दुर्गम भागात हे चित्र पुन्हा एकदा पाहण्यास मिळाले.
कर्जतच्या दुर्गम भागातील दृश्य पाहिले की स्वातंत्र्याची ७८ वर्षे पूर्ण होत असताना देश पारतंत्रात असल्याचे जाणवते. इंग्रजांची जुलमी राजवट आजही सरकार, प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्याच्यामागे सुरू आहे. विकासाच्या नावाखाली ढोल बडवणारे लोकप्रतिनिधींना मात्र कर्जत तालुक्यातील निखाऱ्यावरील खरे वास्तव्य लपवता येणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केलेला रस्ता अद्याप तयार होत नाही. म्हणून आदिवासींच्या नशिबी डोलीयात्राच कायम आहे. म्हणूनच सरकारच्या बेफिकिरीमुळे अजून किती बळी घेणार म्हणून प्रश्न पुढे आला.
खांद्यावरच्या झोळीतुन खडतर प्रवास
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगर कुशीत राहणाऱ्या आसल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आसल वाडी येथील मधु गौरू पारधी या जेष्ठ नागरिकाची प्रकृती बिघडली होती. यामुळे रुग्णालयात तत्काळ दाखल करायचे होते. गावात मान्सून काळात वाहनांसाठी रस्ता बंद होत असल्याने एकच पर्याय या नागरिकांसमोर उरलेला असतो. खांद्यावर लाकडीकाठीचा आधार घेत कापडी झोळी करून अनवाणी पायपीट करून रुग्णाला हॉस्पिटलपर्यंत दाखल करण्यात आले. पावसात छत्री सांभाळायची की रुग्णाला धीर द्यायचा. परंतु त्यांच्यावर प्लॅस्टिक पिशवी हंतरूण झोळी करून चार किलोमीटर पायपीट करून पुढे रिक्षाने नेरळ येथे रुग्णालयात पारधी यांना दाखल करण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी रस्त्याचे उद्घाटन
आसल वाडी आणि १२ आदिवासी वाड्यांना जोडणारा राज्य मार्ग ७६ माथेरान जुमाप्पाटी ह्या रस्त्याचे ऑनलाईन पद्धतीने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन केले होते. १४ कोटी ८० लाख रुपये एवढा निधी मंजूर होऊन वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. मात्र आज याला दोन वर्षे होत असून अद्याप रस्ता तयार झालेला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.