Roha News Saam tv
महाराष्ट्र

Roha News : पाणी पुरवठा अभियंत्यास भररस्त्यावर मारहाण; रोहा नगरपालिकेचे कर्मचारी आक्रमक

Raigad Roha News : रोहा शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. रात्रीच्या सुमारास हे काम सुरु असताना ओंकार भुरण हे कामाच्या ठिकाणी जाऊन देखरेख करीत होते. यावेळी कन्हैया पडवळ आणि एक व्यक्ती त्याठिकाणी आले

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रोहा (रायगड)
: रोहा नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता रात्रीच्या वेळेस कामाच्या ठिकाणी देखरेख करत असताना त्यांना काही जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून मारहाणीच्या घटनेनंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून निषेध व्यक्त करत कर्मचाऱ्यांचे आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

रायगड जिल्ह्यातील रोहा नगर पालिकेचे पाणी पुरवठा अभियंता ओंकार भुरण यांना मारहाण करण्यात आली आहे. रोहा शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. रात्रीच्या सुमारास हे काम सुरु असताना ओंकार भुरण हे कामाच्या ठिकाणी जाऊन देखरेख करीत होते. यावेळी कन्हैया पडवळ आणि एक व्यक्ती त्याठिकाणी आले. यानंतर दोघांमध्ये वाद होऊन किरकोळ कारणावरून वाद घालत भुरण यांना मारहाण केली.  

पोलिसात गुन्हा दाखल 

यावेळी काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी भुरण यांना सोडविले. लोखंडी रॉडने मारहाण झाल्याने भुरण हे किरकोड जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे. दरम्यान घटनेनंतर सदर मारहाण प्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

कर्मचारी झाले आक्रमक 

दरम्यान या घटनेनंतर रोहा नगर पालिकेचे कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी या मारहाणीचा निषेध केला. तसेच कर्मचाऱ्यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तर आरोपीवर कडक कारवाई झाली नाही; तर सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT