सचिन कदम
रायगड : रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत अद्याप तडजोड झाल्याचे चित्र दिसत नाही. एकीकडे शेकाप आणि शिवसेनेत तडजोडीचे प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेसच्या बंडखोराना थोपवण्याचे आव्हान शेकाप समोर आहे. त्यांचीही मनधरणी करण्याची वेळ शेकापवर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha election) अर्ज माघारीसाठी दोन दिवस बाकी असल्याने मतदारसंघात बंडखोरीचे आव्हान महाविकास आघाडी व महायुती समोर उभे आहे. पक्षातील नाराज पदाधिकार्यांची बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यानुसारच रायगडमध्ये काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र ठाकूर यांनी अलिबाग आणि श्रीवर्धन या दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राजेंद्र ठाकूर यांनी (Alibag) अलिबागमधून आपला अर्ज मागे घ्यावा; यासाठी त्यांची समजूत काढली जात आहे. परंतु अर्ज माघारीसाठी तयार नाहीत.
कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय
दरम्यान शेकाप नेते जयंत पाटील, उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी काँग्रेस भवन इथं येवून राजेंद्र ठाकूर व त्यांच्या समर्थकांशी चर्चा केली. अलिबाग मधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. याबाबत दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेवू असं राजेंद्र ठाकूर यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.