सचिन कदम
रायगड : बाजारात नकली नोटा चलनात आल्याचे निदर्शनात आल्यानंतर पोलिसांकडून या बाबत तपास सुरु करण्यात आला होता. यात रायगड जिल्ह्यातील गोरेगाव पोलिस ठाणा हद्दीतील नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत नकली नोटा जप्त करण्याची कारवाई केली आहे.
पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचे काम पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची टोळी करीत असल्याची पोलिसांना माहिती होती. चलनात असलेल्या असली नोटा घेऊन त्या बदल्यात बनावट नोटा चलनात आणल्या जात होत्या. या प्रकरणी प्राप्त माहितीवरून रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि गोरेगाव पोलिसांनी टेमपाले गावात छापा टाकत कारवाई केली आहे.
दोघे ताब्यात एकजण झाला फरार
पोलिसांनी केलेल्या सदरच्या कारवाईत पोलिसांच्या हाती पाचशे रुपयांची एक आणि दोनशे रूपयांच्या चार बनावट नोटा हाती लागल्या. तर दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर एक जण फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. अब्दुल रशीद खानदेशी (रा. टेमपाले), सुनील मोरे (रा. निगडी, म्हसळा) आणि मेहबूब उलडे (रा. श्रीवर्धन) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी गोरेगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.
व्यायामपटू कडून उत्तेजक मॅफेटेरामाईनची विक्री
कोल्हापूर : नशेसाठी वापरण्यात येणारे मॅफेटेरामाईन सल्फाईट इंजेक्शनची विक्री करणाऱ्या व्यायामपट्ट विवेक शिवाजी पाटील आणि विक्रेता तेजस उदयकुमार महाजन यांना पोलिसांनी अटक केली. डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नसतानाही बेकायदेशीरपणे विक्री केली जात होती. स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेने संशयितांकडून ७५ कुप्या, दोन दुचाकी, मोबाईल असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.