Alibag News Saam tv
महाराष्ट्र

Alibag News : जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रचार; शेकापच्या उमेदवारावर आचारसंहिता भंगचा गुन्हा

Raigad news : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमावलीनुसारच प्रचार करणे बंधनकारक आहे

Rajesh Sonwane

सचिन कदम 
रायगड
: विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. सर्वांच्या भेटी घेऊन मतदारांना मत देण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान प्रचार करण्यास सरकारी कार्यालयात जाण्यास मनाई असताना शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रचार केल्याप्रकरणी त्यांच्या आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या नियमावलीनुसारच प्रचार करणे बंधनकारक आहे. अर्थात प्रचार करताना आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने प्रचाराचा कालावधी व वेळ ठरवून देण्यात आली आहे. तसेच सरकारी कार्यालयात प्रचार करण्यास देखील बंदी आहे. असे असताना देखील अलिबागमध्ये शेकापच्या उमेदवाराने सरकारी कार्यालयात जाऊन आपला प्रचार केला आहे. 

अलिबाग (Alibag) विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात आचार संहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कार्यालयात प्रचाराला बंदी असताना चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यांसह जावून तिथं आपला प्रचार केला; असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेवून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT