Mumbai-Goa Highway Traffic Saam tv
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

Raigad Latest News: नेमकी वाहतूक कोंडी कशामुळे झाली आहे यामागचे कारण अस्पष्ट आहे.

Priya More

सचिन कदम, रायगड

Raigad News: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी (Mumbai-Goa Highway Traffic) झाली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातल्या पेण ते वडखळ दरम्यान दोन्ही मार्गीकेवर मोठी वाहूतक कोंडी झाली आहे. वाहनांच्या ५ किलो मीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

नेमकी वाहतूक कोंडी कशामुळे झाली आहे यामागचे कारण अस्पष्ट आहे. या वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी बराच वेळ अडकून राहिल्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांचे हाल होत आहे.

दरम्यान, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर उद्या सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रोव्हिजन केली जाणार आहे. यासाठी उद्या एक्स्प्रेस वे १२ वाजल्यापासून ते २ वाजेपर्यंत असा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.

या दोन तासांत एक्स्प्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाईल. याच गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसविले जातील. हेच सीसीटीव्ही अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवतील, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT