Raigad : चोरी गेलेला 60 लाखांचा मुद्देमाल जिल्हा पोलिसांनी दिला मिळवून!  राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

Raigad : चोरी गेलेला 60 लाखांचा मुद्देमाल जिल्हा पोलिसांनी दिला मिळवून!

चोरीस गेलेल्या वस्तूची किंमत महत्वाची नसते. या वस्तुमध्ये लोकांच्या भावना असता. त्या जास्त महत्वाच्या असतात. असे कोकण परीक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक संजय माहिते यांनी म्हटले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरी, फसवणुकीत गेलेले सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहन असा 60 लाखाचा जप्त केलेला मुद्देमाल 29 फिर्यादींना परत मिळवून देण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. कोकण परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते मूळ मालकांना त्यांचा चोरीला गेलेला ऐवज हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे आपले चोरीस गेलेले दागिने, पैसे, वाहन पुन्हा पोलिसांच्या जलद तपासामुळे परत मिळाल्याने साऱ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद उमटलेला दिसत होता.

हे देखील पहा :

अलिबाग जिल्हा पोलिस मुख्यालय येथील जंजिरा सभागृहात पोलिसांनी जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक, चोरी या गुन्ह्यातील जप्त केलेल्या मुद्देमालाचे मूळ मालक यांना हस्तांतरण कार्यक्रम आयोजित केला होता. कोकण परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, गृह विभागाचे जगदीश काकडे, मूळ मालक, या कार्यक्रमास उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, माणगाव, कर्जत, पेण या तालुक्यात जबरी चोरी, फसवणूक, घरफोडी असे वेगवेगळे गुन्हे घडले होते. रायगड पोलिसांनी या गुन्ह्यांचा शीघ्र तपास करून आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून 1105 ग्राम सोने, 65 ग्राम चांदी, रोख रक्कम, मोबाईल, तीन वाहने असा 60 लाख 18 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाकडून फिर्यादी यांना परत करण्याचे आदेश झाले. त्यानंतर आज कोकण परिक्षेत्राचे उप महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते 29 गुन्ह्यातील फिर्यादी मालकांना त्यांचे ऐवज परत करण्यात आले. आपला गेलेला ऐवज परत मिळाल्याने फिर्यादी यांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.

चोरीस गेलेल्या वस्तूची किंमत महत्वाची नसते. या वस्तुमध्ये लोकांच्या भावना असता. त्या जास्त महत्वाच्या असतात. एखाद्या महिलेचे मंगळसुत्र चोरीस गेल्यास मंळसूत्राच्या किमतीपेक्षा त्या मंगळसुत्रात तीच्या भावना असतात म्हणून ती दुःखी असते. त्यामुळे चोरीस गेलेले मंगळसूत्र जेव्हा तीला परत मिळते तेव्हा तीला आनंद होतो, असे कोकण परीक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक संजय माहिते यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

SCROLL FOR NEXT