Karjat News Saam tv
महाराष्ट्र

Karjat News : बनावट सिगारेट बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; ५ कोटीचा मुद्देमाल जप्त, १५ जणांना अटक

Karjat News : मागील ६ महिन्यांपासून हा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली

Rajesh Sonwane

सचिन कदम 
कर्जत
 : कर्जत तालुक्यातील सांगवी या ठिकाणी बनावट सिगारेट तयार करण्याचा कारखाना सुरु होता. पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकत पर्दाफाश केला आहे. रायगड पोलिसांनी ही कामगिरी केली असून येथून तब्बल ५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

रायगड पोलिसांच्या (Raigad Police) स्थानिक गुन्हे शाखेने २४ ऑक्टोम्बरला एका फार्म हाऊसवर धाड टाकली. या ठिकाणी गोल्ड फ्लेक या नामांकित ब्रँडचे बनावट सिगारेट बनवण्याचा कारखाना सुरू होता. मागील ६ महिन्यांपासून हा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी येथे टाकलेल्या कारवाईत २ कोटी ३१ लाख रुपयांचे सिगारेट, तसेच सिगारेट बनवण्यासाठी लागणारे तंबाखू व इतर साहित्य तसेच मशिनरी मिळून ५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

१५ जण ताब्यात 

बनावट सिगारेट बनविण्याच्या कारखान्यावर (Police Raid) पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच येथील १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. या कारखान्याचा मालक दाक्षिणात्य असून त्याचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT