Irshalwadi Landslide News Saam Tv
महाराष्ट्र

Irshalwadi Landslide News: मित्रांसोबत मोबाईलमध्ये गेम खेळत होतो म्हणून वाचलो; आई-वडील सगळेच गेले, ढिगाऱ्याकडे पाहून तरुणाचा आक्रोश

Priya More

Irshalwadi Landslide Update: खालापूरजवळच्या इर्शाळगडाच्या (Irshalgad) पायाथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर (Irshalwadi Landslide) बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेमध्ये आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पण मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर एकच आक्रोश केला आहे. आपला माणून वाचेल या आशेने सर्वजण त्याचठिकाणी बसून आहेत. कोणाचे आई-वडील, तर कोणाची पत्नी आणि मुलं, तर कोणाचं संपूर्ण कुटुंबच ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अशामध्ये या दुर्घटनेत एक तरुण बचावला आहे. पण या तरुणाच्या कुटुंबातील सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. आपल्या कुटुंबीयांसाठी रडून रडून हा तरुण बेहाल झाले आहेत.

तरुणाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, 'हा तरुण आपल्या मित्रांसोबत रोज शाळेमध्ये झोपायला जात होता. बुधवारी रात्री देखील तो शाळेमध्ये झोपला होता. शाळेमध्ये काही मुलं मोबाईलवर गेम खेळत होते. त्याचवेळी साडेदहाच्या सुमारास या मुलांना आवाज आल्याने ते बाहेर पडले तर त्यांना दरड कोसळल्याचे समजले. त्यांनी गावातील लोकांना आरोळी दिली त्यामुळे पाच ते सहा घरातील लोकं बाहेर पळून आली त्यामुळे ती वाचली.'

'पण या तरुणाचे आई, वडील, दोन भाऊ आणि भावाची दोन मुलं असे एकूण सहा जण ढिगाऱ्याखाली अडकले आहे. ही मुलं शाळेमध्ये झोपायला होते त्यामुळे ते सर्वजण बचावले. पण त्यांची घरं आणि कुटुंबातील सर्व सदस्य हे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.', असे त्यांनी सांगितले. आपल्या कुटुंबीयांसाठी हे तरुण सतत रडत आहे. ढिगाऱ्याखालून त्यांना जीवंत बाहेर काढले जाईल या आशेने ते घटनास्थळावर तळ ठोकून आहेत. या तरुणांचे आणि त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर एकच आक्रोश केला आहे.

'इर्शालवाडीमध्ये एकूण ४५ घरं होती. मुलांनी आवाज दिल्यामुळे फक्त ५ घरातील लोकं वाचली आहेत. बाकी सर्व घरं आणि त्यामध्ये राहणारे गावकरी हे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.', असे देखील त्यांनी सांगितले. अवघ्या काही सेकंदामध्ये संपूर्ण इर्शाळवाडी जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे अनेकांची घरं, संसार उद्धवस्त झाली. सध्या घटनास्थळावर स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरु आहे. आतापर्यंत १७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT