>> सचिन कदम, साम टीव्ही
Maharashtra Rain Udates : कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथील जामरुख पाझर तलावातून गळती होत असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन गावातील नागरिकांचं जवळच्या विजय भूमी विद्यापीठ इथं स्थलांतर करण्यात आले आहे.
संपूर्ण गावाला या पूराचा धोका असल्याने अक्ख गाव रिकामं करण्यात आलं आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी प्रतिसाद देऊन तात्काळ गाव रिकामे केले आहे. या गावात पुराचं पाणी शिरलं आहे. या गावातील काही घरं पाण्याखाली गेली असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. (Tajya Marathi Batmya)
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातलं असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. जिल्ह्यातील पोलादपुर महाबळेश्वर जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. प्रतापगड फाट्यापासून जवळच डोंगरानी छोट्या मोठ्या दगडी रस्त्यावर कोसळल्या आहेत. त्यामुळे सध्या घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून दरड हटवण्याचं काम सुरू आहे. (Latest Political News)
रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट
गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच हवामान खात्याने पावसासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. पुढील ४८ तासांत राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने पालघर, ठाणे, रायगड, सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.