Raigad Crime News Saam TV
महाराष्ट्र

Raigad Crime News: शेतजमिनीचा वाद विकोपाला; दिराचं ५० वर्षीय वहिनीसोबत संतापजनक कृत्य

Roha Crime News: रायगडच्या रोहा तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Raigad Crime News: रायगडच्या रोहा तालुक्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इथे शेतजमिनीच्या वादातून दिराने आपल्याच ५० वर्षीय भावजयीचा विनयभंग केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार रोहा तहसिल कार्यालयातच घडला. भावजयीने विरोध केला असता, दिराने तिला आणि तिच्या मुलीला मारहाण देखील केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रोहा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

या घटनेनंतर आरोपी दीर फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दिलीप (वय ६७) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथे राहणाऱ्या दिलीप व त्यांच्या भावाची नागोठणे येथे वडिलोपार्जित मालमत्ता आहे. या मालमत्तेवरून वडके कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. (Breaking Marathi News)

या वादग्रस्त मालमत्तेविषयी रोहा (Raigad) प्रांत कार्यालयात दिवाणी दावा सुरू आहे. २७ एप्रिल रोजी दिवाणी दाव्याच्या अनुषंगाने दोन्ही पक्षकार प्रांत कार्यालयात हजर होते. प्रांत कार्यालयातील सुनावणीविषयी कामकाज आटोपून फिर्यादी महिला आपल्या मुलीसमवेत जिन्यावरून खाली उतरत होती.

यावेळी आरोपी दिलीप यांनी आपल्या भावजयीचा विनयभंग केला. त्याच वेळी पीडित महिलेने आरोपीला ढकलून विरोध केला असता, त्याने रागाच्या भरात पीडित महिलेला मारहाण केली. तसेच त्यांच्या मुलीलादेखील धक्काबुक्की केली. इतकंच नाही तर आरोपीने दोघींना ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत रोहा पोलिस (Police) ठाण्यात विनयभंग व मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक टी. एस. पारवे पुढील तपास करत आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT