Raigad School Holiday Saam TV
महाराष्ट्र

Raigad School Holiday: राज्यात 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; रायगडमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Raigad Colleges & School Holiday: महाविद्यालयांना आज (२४ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आलीये.

Ruchika Jadhav

Raigad Rain Update: राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे पुढील 5 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Latest Raigad News)

रायगडसह पालघर, रत्नागिरी, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. आज सकाळपासूनच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसत आहे. त्यामुळे रायगड (Raigad) जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज (२४ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आलीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तसेच जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट असल्याने प्रशासनाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.

जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जोरदार पाऊस आणि पुराची शक्यता लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेतलीये. त्यामुळे शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीये.

पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी

पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सततच्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीला मोठा पूर आला असून पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

पंचगंगा नदीची (Panchganga River) पाणीपातळी 39 फुट 03 इंचावर गेली असून नदीच्या धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि यंत्रणा अलर्ट झाल्या असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT