Sushma Andhare Helicopter Crash Viral Video:  Saamtv
महाराष्ट्र

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Sushma Andhare Helicopter Crash Viral Video: सुदैवाने सुषमा अंधारे बसण्याआधीच ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. महाडमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ सध्या माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

रायगड|ता. ३ मे २०२४

राज्यात सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांचे दौरे, सभा, गावभेटींचे सत्र सुरू आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली. सुदैवाने सुषमा अंधारे बसण्याआधीच ही दुर्घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. महाडमध्ये झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ सध्या माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

शिवसेना ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ सुषमा अंधारे यांची काल कोकणात सभा होती. आज त्या बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी जाणार होत्या. यासाठी त्यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर महाडमध्ये आले होते. सकाळी साडे ९ वाजण्याच्या सुमारास महाडमध्ये तयार केलेल्या हेलिपॅडवर त्या पोहोचल्या होत्या. मात्र हेलिकॉप्टर उतरत असतानाच ते क्रॅश झाले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचे तुकडे झाले.

सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. स्थानिकांच्या मदतीने तात्काळ पायलटला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टर उतरत असतानाच सुषमा अंधारे फेसबूक लाईव्ह करत होत्या. त्यामुळे त्यांच्याच कॅमेऱ्यात हा अपघाताचा थरारक क्षण कैद झाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हेलिकॉप्टर खाली उतरण्यासाठी आकाशात गिरट्या घालत आहे. अचानक आकाशातच हेलिकॉप्टर हेलकावे घालू लागले अन् बघता बघता कोसळले. खाली उतरत असताना हेलिकॉप्टर भरकटल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro : मुंबई मेट्रोवर 'नागिनचा' कब्जा, प्रवाशांना थक्क करणारा अनुभव, VIDEO व्हायरल

मोठी बातमी; एबी फॉर्म खाणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागे, कारण आलं समोर

Maharashtra Live News Update: कल्याणी कोमकर अजित पवारांच्या भेटीला

Amaravati Tourism: गुलाबी थंडीच्या दिवसात अमरावतीमध्ये करा फिरण्याचा प्लान; 'हे' Hidden spots ठरतील बेस्ट ऑप्शन

Winter Season : हिवाळ्यात लसूण का खावा? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT