ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात शरीर थंड पडते म्हणून शरिराला उष्णता आणि ताकद लागते. लसूण उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे थंडीमध्ये शरीराला आतून गरम ठेवतो.
लसणात अॅंटीऑक्सिडंट्स आणि अॅंटीबॅक्टेरियल गुण असतात, जे सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करतात.
हिवाळ्यात होणाऱ्या संसर्ग सर्दी, खोकला आणि घसा दुखीवर लसूण हा नैसर्गिक औषधासारखा काम करतो.
लसूण कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि रक्ताभिसरण सुधारतो, हार्ट अॅटॅक येवून गेलेल्या व्यक्तींनी लसूण खाल्लाच पाहिजे.त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
हिवाळ्यात दरोरोज लसूण खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हिवाळ्यात जड पदार्थ पचवण्यासाठी जड जातात तेव्हा लसूणचे सेवन करावे. गॅस, अपचन आणि पोटदुखी कमी करतो.
हिवाळ्यात गुडघेदुखी व सांधेदुखीच्या समस्या वाढतात.अशा वेळी लसूण खाणे फायदेशीर ठरते.
लसूण कच्चा, भाजून, चटणीत किंवा भाजीमध्ये वापरून खावा. पण लसणाचे प्रमाणातच सेवन करणे आरोग्यासाठी चांगल आहे.
Rosemary Oil For Hair : सगळे उपाय करुनसुध्दा केस गळणे थांबत नाही, मग वापरुन बघा हे गुणकारी रोझमेरी तेल