ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल प्रत्येक व्यक्ती केस गळणे आणि केसांची वाढ थांबणे या समस्येने त्रस्त आहे. ही समस्या दूर करण्यासाठी लोक विविध प्रकारचे शॅम्पू आणि तेल वापरतात.
पण तुम्ही तुमच्या केसांना कधी रोझमेरी तेल लावले आहे का? रोझमेरीच्या पानांपासून बनवलेले हे तेल केसांच्या समस्या कमी करते.
रोझमेरी तेलामध्ये कार्नोसिक अॅसिड, कार्नोसोल आणि अनेक अॅंटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांची मुळे मजबूत करतात.
केसांना रोझमेरी तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत. ते जाणून घ्या.
जर तुमचे केस वेगाने गळत असतील, तर रोझमेरी तेल ते कमी करण्यास मदत करेल.
हे तेल लावल्यामुळे तुमचे नवीन केसं येण्यास सुरुवात होईल. हे स्कॅल्पला मजबूती देते आणि केस येण्यास सुरुवात होते.
केसांना रोझमेरी तेल लावल्याने स्कॅल्पचे ब्लड सर्कुलेशन सुधारते. यामुळे केसांना आतून पोषण मिळते.
रोझमेरी तेल ड्राय केसांपासून सुटका मिळवण्यासाठी देखील मदत करेल. ते तुमच्या ड्राय आणि निस्तेज केसांना मऊ आणि मुलायम बनवेल.
रोझमेरी तेल तुमच्या केसांवर मसाज करत लावा. आर्धातास किंवा रात्रभर लावून ठेवा आणि मग केस धुवून टाक. आठवड्यातून हे तेल केसांवर २ ते ३ वाळा लावावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.