Amaravati Tourism: गुलाबी थंडीच्या दिवसात अमरावतीमध्ये करा फिरण्याचा प्लान; 'हे' Hidden spots ठरतील बेस्ट ऑप्शन

Surabhi Jayashree Jagdish

अमरावती

हिवाळ्याच्या दिवसात अमरावतीमध्ये फिरण्यासाठी अनेक जागा आहेत. थंड हवामान, हिरवळ, वन्यजीवन आणि धार्मिक-ऐतिहासिक ठिकाणं यामुळे काही ठिकाणचा परिसर अधिक खुलून दिसतो.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

हिवाळ्यात मेळघाटचं जंगल हिरवगार दिसतं. या काळात वाघ, बिबटे, हरणं आणि विविध प्राणी दिसण्याची शक्यता जास्त असते. सफारीसाठी थंडीचा हंगाम सर्वात सुरक्षित आणि योग्य मानला जातो.

चिखलदरा हिल स्टेशन

अमरावती जिल्ह्यातील एकमेव हिल स्टेशन म्हणून चिखलदरा प्रसिद्ध आहे. थंड हवा, धुके आणि दऱ्या-डोंगर हिवाळ्यात खूप सुंदर दिसतात. कॉफी पॉइंट, पंचबोल पॉइंट आणि भीमकुंड पर्यटकांना आकर्षित करतात.

सेमाडोह तलाव

मेळघाटच्या कुशीत वसलेला हा तलाव निसर्गप्रेमींसाठी खास आहे. हिवाळ्यात पाण्याभोवतीची हिरवळ आणि शांत वातावरण मन प्रसन्न करतं.

गाविलगड किल्ला

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेला हा ऐतिहासिक किल्ला हिवाळ्यात फिरण्यासाठी योग्य आहे. थंडीमुळे ट्रेकिंगचा थकवा कमी जाणवतो. किल्ल्यावरून दिसणारा निसर्गाचा नजारा खास अनुभव देतो.

वडाळी तलाव

शहराजवळच असलेलं हे ठिकाण सकाळी-संध्याकाळी फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात थंड हवेत चालायला किंवा बसून वेळ घालवायला छान वाटतं.

संत गाडगेबाबा मंदिर

हिवाळ्यात दर्शनासाठी गर्दी कमी असल्याने शांततेत पूजा करता येते. धार्मिक श्रद्धा आणि मानसिक शांती यासाठी हे ठिकाण महत्त्वाचं आहे. आजूबाजूचं स्वच्छ आणि शांत वातावरण भक्तांना आकर्षित करतं.

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

peanut powder acidity
येथे क्लिक करा