Raigad accident Saam tv
महाराष्ट्र

Raigad accident : रायगडमध्ये भीषण अपघात; सिमेंट मिक्सर उलटला, एका कामगाराचा मृत्यू

Raigad accident News : रायगडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रायगडच्या महाड तालुक्यात गोंडाळे येथे सिमेंट मिक्सर उलटून भीषण अपघात झाला आहे.

Vishal Gangurde

सचिन कदम, रायगड

Raigad accident News :

रायगडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. रायगडच्या महाड तालुक्यात गोंडाळे येथे सिमेंट मिक्सर उलटून भीषण अपघात झाला आहे. मांडले नदी बंधाऱ्यावर झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या महाड तालुक्यात गोंडाळे येथील मांडले नदीच्या बंधाऱ्यावर भीषण अपघाताची घटना घडली. रायगडच्या मांडले नदीच्या बंधाऱ्यावर सिमेंट मिक्सर उलटून अपघात झाला. मांडले या स्थानिक नदीवर बंधाऱ्याचे काम सुरु असताना दुर्घटना घडली.

या बंधाऱ्यावर सिमेंट मिक्सर उलटून दोन कामगार अडकले. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पोलीस आणि स्थानिक घटनास्थळी धावले. पोलिसांनी अथक प्रयत्न करत या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं?

सिमेंट मिक्सर कोसळून झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला आहे. तर एक कामगार सुदैवाने बचावला आहे. तो गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर महाडच्या ट्रॉम केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. ही दुर्घटना महाड तालुक्यातील गोंडाळे येथे मांडले नदी पात्रात घडली. येथे शासनामार्फत पाणी आडवण्यासाठी बंधारा बांधण्याचे काम सुरु होते. यावेळी सदर सिमेंट मिक्सर खाली कोसळला.

महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रमेश तडवी, उपनिरिक्षक पवार यांच्या सह पोलिस दल आणि स्थानिकांकडून मदतकार्य करण्यात आले. मैनुद्दीन अन्सारी असे मृत कामगाराचे नाव आहे. तर सुमित ढाणे हा कामगार सिमेंट मिक्सर खाली अडकला. मात्र त्याला सुखरूप बाहेर काढण्या कामी बचाव पथकाला यश आले. सुमित ढाणे हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुती सरकारला 'सुप्रीम' झटका, पोलिसांवर गुन्हे दाखल होणारच, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट

Chetana Bhat: पानाआड दडलंय सौंदर्य, महाराष्ट्राची हास्यजत्रेतील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Maharashtra Monsoon Destinations : ऑगस्टच्या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लान करताय? मग या Top 7 ठिकाणांना भेट द्या

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी; छावा संघटना आक्रमक

WhatsApp मध्ये कॅमेरा फिचर अपडेट, कमी प्रकाशातही फोटो येणार क्लिअर

SCROLL FOR NEXT